बातम्या

घरफोडीप्रकरणी पन्हाळा पोलिसांची कौतुकास्पद कारवाई

Crime news00


By nisha patil - 7/24/2025 9:07:45 PM
Share This News:



घरफोडीप्रकरणी पन्हाळा पोलिसांची कौतुकास्पद कारवाई – १.४० लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत

पन्हाळा | प्रतिनिधी – शहाबाज मुजावर

पन्हाळा पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाने उत्कृष्ट तपास करत १.४० लाख रुपयांच्या घरफोडीप्रकरणी आरोपीस अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

फिर्यादी महेश शशिकांत तोरसे (वय ४३, रा. साताओं, ता. पन्हाळा) यांच्या घरात १० जून ते २० जुलै २०२५ या कालावधीत अज्ञात चोरट्याने शिरून बेडरूममधील पत्र्याच्या पेटीत ठेवलेले सोन्याचे नेकलेस आणि कर्णफुले असा एकूण १,४०,००० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १४९/२०२५, भादंवि कलम ३०५(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पार्थ हिंदुराव नाळे (वय १९, रा. सातार्डे, ता. पन्हाळा) यास ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने पोलिसांनी घेतलेल्या विश्वासात आणि कौशल्यपूर्ण चौकशीत चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेला सोन्याचा नेकलेस आणि कर्णफुले असा एकूण १,४०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार सी., उपविभागीय पोलीस अधिकारी (शाहूवाडी) आप्यामो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले, पो. उपनिरीक्षक महेश कोंडर्भरी, सहाय्यक फौजदार मारुती नाईक, पो.हवा. संतोष वायदंडे, पो.ना. तौसिफ मुल्ला आणि पो.शि. प्रविण बोरचाटे यांनी केली.

सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार मारुती नाईक करत आहेत.


घरफोडीप्रकरणी पन्हाळा पोलिसांची कौतुकास्पद कारवाई
Total Views: 206