राजकीय

पावसाने पिकांचे नुकसान राजू शेट्टींची पाहणी

Crop damage due to rain


By nisha patil - 8/27/2025 12:40:05 PM
Share This News:




पावसाने पिकांचे नुकसान; राजू शेट्टींची पाहणी, तातडीने मदतीची मागणी

बुलढाणा जिल्ह्यातील सोमठाण (ता. चिखली) परिसरात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, उडीद व कापूस या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सोमठाण येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी राज्य सरकारने तातडीने मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली.


पावसाने पिकांचे नुकसान; राजू शेट्टींची पाहणी
Total Views: 56