बातम्या

चंपाषष्ठीनिमित्त खोलखंडोबात भक्तांची उसळलेली गर्दी..

Crowd of devotees thronged Kholkhandoba


By nisha patil - 11/26/2025 4:21:35 PM
Share This News:



चंपाषष्ठीनिमित्त खोलखंडोबात भक्तांची उसळलेली गर्दी..

जमिनीपासून ३० फूट खोल असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा ओघ..

चंपाषष्ठीच्या निमित्ताने आज (बुधवार) खोलखंडोबा मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. विशेष म्हणजे, या पावन पर्वासाठी संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता. विविध फुलांची सजावट, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि दिव्यांच्या रोषणाईमुळे परिसर न्हाऊन निघाला होता.

बुरूड गल्लीजवळ असलेले हे मंदिर आपल्या अद्वितीय रचनेसाठी ओळखले जाते. ‘खोलखंडोबा’ या नावातील ‘खोल’ हा शब्दच त्याचे वैशिष्ट्य अधोरेखित करतो. कारण येथे असलेले शिवलिंग हे जमिनीपासून तब्बल २५ ते ३० फूट खोल उतरल्यावर दिसते. दगडी पायऱ्यांमधून खाली गेल्यावर दिसणारी प्राचीन दगडी खांबांची रचना मंदिराची ऐतिहासिकता जिवंत ठेवते.

कोल्हापूरमधील सर्वांत जुना परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोलखंडोबात आज शेकडो भाविकांनी एकत्र येत मनोभावे पूजन केले. चंपाषष्ठी निमित्त विशेष विधी, आरती आणि भक्तीगीतांनी मंदिर परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण केले होते.


चंपाषष्ठीनिमित्त खोलखंडोबात भक्तांची उसळलेली गर्दी..
Total Views: 15