बातम्या
सीएसआरद्वारे शहर विकासासाठी बँकर्सनी साथ द्यावी - आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे आवाहन
By nisha patil - 10/4/2026 6:22:00 PM
Share This News:
सीएसआरद्वारे शहर विकासासाठी बँकर्सनी साथ द्यावी - आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे आवाहन
कोल्हापूर, ता. 09 : कोल्हापूर महानगरपालिकेचे नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी सीएसआरच्या माध्यमातून शहर विकासाला चालना देण्यासाठी शहरातील 15 राष्ट्रीयकृत व शेड्युल्ड कमर्शिअल बँकांच्या प्रतिनिधींची आज सायंकाळी 4 वाजता आयुक्त कार्यालयात बैठक घेतली.
यावेळी बोलताना आयुक्त डॉ. भारुड यांनी बँकांमध्ये उपलब्ध असलेल्या व्यावसायिक तज्ज्ञांच्या कौशल्याचा उपयोग शहर विकासासाठी करावा, असे सांगितले. महापालिकेच्या उद्यानांची देखभाल, सुशोभीकरण तसेच वॉर्ड कार्यालये व इतर सार्वजनिक ठिकाणी आवश्यक सुविधा सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमास प्रतिसाद देत उपस्थित बँकर्सनी महापालिकेसोबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सीएसआर निधीचा प्रभावी वापर करण्यात येईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक तसेच विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सीएसआरद्वारे शहर विकासासाठी बँकर्सनी साथ द्यावी - आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे आवाहन
|