ताज्या बातम्या
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचा जिल्हा दौरा
By nisha patil - 2/21/2026 1:31:09 PM
Share This News:
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचा जिल्हा दौरा
कोल्हापूर :- माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.45 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता कोल्हापूर विमानतळ येथून मिरजकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता मिरजहून शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. दुपारी 3.45 वाजता राजर्षी शाहू छत्रपती महाराज जन्मस्थळाकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता राजर्षी शाहू छत्रपती महाराज जन्मस्थळ येथे आगमन व विविध कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 6 वाजता टाऊन हॉल, संग्रहालयाकडे प्रयाण. सायं. 6.15 वाजता टाऊन हॉल संग्रहालय येथे आगमन संग्रहालयाची पाहणी. सायं. 6.45 वाजता डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवन ताराराणी विद्यापीठाकडे प्रयाण. सायं. 7 वाजता डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवन, ताराराणी विद्यापीठ येथे आगमन व कव्वाली कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 7.30 वाजता भजनी मंडळासंदर्भातील कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवन, ताराराणी विद्यापीठ) रात्री 8 वाजता शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. रात्री 8.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्काम.
रविवार, 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.00 वाजता टाकाळा, कोल्हापूर येथे आगमन व संत गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित जलतीर्थ कोल्हापूर या स्वच्छता मोहिमेत सहभाग, सकाळी 8.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथून श्री महालक्ष्मी/अंबाबाई मंदीराकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता महालक्ष्मी/अंबाबाई मंदीर येथे आगमन व दर्शनासाठी राखीव. सकाळी 9.45 वाजता कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. सकाळी 11.15 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचा जिल्हा दौरा
|