विशेष बातम्या
श्री राधाकृष्ण मंदिर वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक हॉलचे आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते उद्घाटन
By nisha patil - 7/5/2025 4:16:46 PM
Share This News:
श्री राधाकृष्ण मंदिर वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक हॉलचे आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते उद्घाटन
येळवण जुगाई पैकी चिखलवाडी (ता. शाहूवाडी) येथे श्री राधाकृष्ण मंदिराच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आमदार डॉ. विनय कोरे (सावकार) यांनी भेट देऊन मंदिरात दर्शन घेतले. या निमित्ताने श्री राधाकृष्ण मंदिर परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक हॉलचे उद्घाटन डॉ. कोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या हॉलसाठी आमदार स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या उपक्रमामुळे परिसरातील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक सुसज्ज सुविधा उपलब्ध झाली आहे.
उद्घाटन प्रसंगी ज्ञानदेव वरेकर (दादा), येळवण जुगाईचे सरपंच सत्यवान खेतल, मनोहर पाटील, रामचंद्र पाटील, राजाराम वरेकर, शरद वरेकर, सहदेव खेतल, नारायण वरेकर, लक्ष्मण केसरकर, महेश पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि चिखलवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले असून ग्रामस्थांनी आमदार डॉ. कोरे यांचे आभार मानले.
श्री राधाकृष्ण मंदिर वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक हॉलचे आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते उद्घाटन
|