शैक्षणिक
डी. वाय. पाटील फिजिओथेरपी कॉलेजला सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान
By nisha patil - 6/5/2025 5:20:48 PM
Share This News:
डी. वाय. पाटील फिजिओथेरपी कॉलेजला सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत फिजिओथेरपी कॉलेजने 98 गुण मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. विजेत्यांचा गौरव विद्यापीठाचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील व कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला.
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून फिजिओथेरपी कॉलेजच्या श्रावणी अशोक जंगटे व स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या प्रणव विनोद आंबले यांना सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत विद्यापीठाच्या आठ संस्थांतील 910 खेळाडूंनी 10 क्रीडा प्रकारांत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासावर भर न देता खेळ, एनएसएस, एनसीसी व सांस्कृतिक कार्यक्रमांमधून सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. शर्मा यांनी केले.
कार्यक्रमास परीक्षा नियंत्रक अभय जोशी, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. अद्वैत राठोड, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, प्राचार्य व क्रीडा प्रमुख उपस्थित होते. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
डी. वाय. पाटील फिजिओथेरपी कॉलेजला सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान
|