शैक्षणिक
डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच 100 टक्के प्रवेश
By nisha patil - 9/16/2025 11:37:44 AM
Share This News:
कोल्हापूर:- डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच 100 टक्के प्रवेश झाले आहेत. आमच्या संस्थेबद्दल विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असलेली विश्वासार्हता यामुळे अधोरेखित झाली असून हाच विश्वास आणखी वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करूया, असे प्रतिपादन डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त माजी आमदर ऋतुराज पाटील यांनी केले. डॉ.डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये आयोजीत गुणवंत विद्यार्थी सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ.डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक 100 टक्के प्रवेश झाले आहेत. दहावीमध्ये चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निकला पसंती दिली असून या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते झाला. यावेळी डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. महादेव नरके यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना विश्वस्त ऋतुराज पाटील पुढे म्हणाले, पॉलिटेक्निकचे प्राचार्य, प्राध्यापक, सर्व विभाग प्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वाच्या योगदानामुळे डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकची विश्वासार्हता दरवर्षी वाढत आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांनी लावलेल्या छोट्याशा शैक्षणीक रोपाचा आता वटवृक्ष झाला आहे. त्यामुळं प्रत्येकाचीच जबाबदारी वाढली आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्या प्रगतीसाठी जे जे काही करता येईल ते सातत्याने करूया.
प्राचार्य डॉ. महादेव नरके म्हणाले, पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियाबाबत सर्व स्टाफकडून अचूक मार्गदर्शन केले जाते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या पाठबळामुळे वर्षभर विद्यार्थ्यांसाठी ज्या ज्या गोष्टी आम्ही करतो त्याची पोहचपावती 100 टक्के ॲडमिशनमधून मिळाली आहे.
यावेळी सर्वाधिक गुण मिळवून प्रवेश घेणाऱ्या सत्यम गायकवाड, शताक्षी शिंदे, आयुष चाळके, पार्थ शेलार, चैत्राली चौगले व अजित भवड या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला कार्यकारी संचालक ए. के. गुप्ता, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, डॉ. पी. के. शिंदे, प्रा. अक्षय करपे, प्रा. सुजाता शिंदे, प्रा. शितल साळोखे, प्रा. राज अलासकर आदींसह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
कसबा बावडा- गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करताना ऋतुराज पाटील. समवेत डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. महादेव नरके, नितीन माळी, महेश रेणके यांच्यासह प्राध्यापक वर्ग
डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच 100 टक्के प्रवेश
|