शैक्षणिक

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटला सुवर्णपदक

D Y Patil School of Engineering and Management wins gold medal


By nisha patil - 2/16/2026 3:17:09 PM
Share This News:



डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटला सुवर्णपदक


राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा, श्रेयस माने-निकिता कोळेकरचे यश 

कसबा बावडा :- महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीतर्फे आयोजित ‘महाराष्ट्र स्टेट स्किल्स कॉम्पिटिशन २०२६’ या राज्यस्तरीय स्पर्धेत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी दिमाखदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र व अभियांत्रिकी विभागातील श्रेयस माने आणि निकिता कोळेकर यांनी ‘लँडस्केप गार्डनिंग’ या कौशल्य प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. या यशाबद्दल त्यांना २५,००० रुपये रोख पारितोषिक, सुवर्णपदक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

युवकांमधील तांत्रिक व व्यावसायिक कौशल्यांना चालना देऊन त्यांना जागतिक स्तरावर सक्षम करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. संगणक अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी ‘लँडस्केप गार्डनिंग’सारख्या वेगळ्या व आव्हानात्मक कौशल्य प्रकारात सुवर्णपदक मिळवणे ही विशेष उल्लेखनीय बाब मानली जात आहे. त्यांच्या या यशामुळे प्रादेशिक फेरी तसेच विशेष बूटकॅम्प प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली आहे.

या यशाबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, रजिस्ट्रार डॉ. व्ही. व्ही. भोसले आणि डॉ. अजित पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील, विभागप्रमुख डॉ. जी. व्ही. ओतारी, प्रा. सतीश रणभिसे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

कोल्हापूर : यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन  करताना डॉ. राकेश कुमार शर्मा,  डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. अजित पाटील आदी.


डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटला सुवर्णपदक
Total Views: 11