बातम्या
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ‘क्यूएस आय-गेज’ डायमंड मानांकन
By nisha patil - 8/26/2025 5:42:14 PM
Share This News:
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ‘क्यूएस आय-गेज’ डायमंड मानांकन
कोल्हापूर : कदमवाडी येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने पहिल्याच प्रयत्नात ‘क्यूएस आय-गेज’ डायमंड श्रेणी मिळवली आहे. याबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांना ‘क्यूएस आय-गेज’चे व्यवस्थापकीय संचालक रविन नायर व सहाय्यक संचालक सुबिन राज यांनी सन्मानित केले.
या सोहळ्यात विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, आय. क्यू. ए. सी. संचालक डॉ. शिंपा शर्मा आदी उपस्थित होते. डॉ. पाटील यांना विद्यापीठाच्या वतीने मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
रविन नायर यांनी म्हटले की, विद्यापीठाने डायमंड मानांकन मिळवणे ही मोठी कामगिरी असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार शिक्षण देण्यासाठी नवे मार्ग खुले होतील.
कुलगुरू डॉ. शर्मा यांनी डॉ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने गाठलेल्या प्रगतीचा गौरव केला व हे मानांकन पुढील वाटचालीस प्रेरणा देणारे असल्याचे सांगितले.
या प्रसंगी विद्यापीठाचे अधिकारी, प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ‘क्यूएस आय-गेज’ डायमंड मानांकन
|