बातम्या

लोकशाहीर द.ना.गव्हाणकर स्मारकासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय

D na gavhankar


By nisha patil - 3/30/2026 11:13:38 PM
Share This News:



**लोकशाहीर द.ना.गव्हाणकर स्मारकासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय ***

आजरा (हसन तकीलदार)**:-आजरा येथे झालेल्या समितीच्या बैठकीत लोकशाहीर द.ना.गव्हाणकर स्मारकासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुकुंददादा देसाई होते.

यावेळी समितीचे कार्याध्यक्ष कॉम्रेड संपत देसाई यांनी समितिच्या कामाचा आढावा घेत यावर्षीचा पुरस्कार आणि स्मारकासाठी पाठपुरावा करण्याबद्दल मत मांडले. मागील पुरस्कार देताना गव्हाणकरांच्या विचार आणि व्यवहाराच्या आधारे काम करणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्याना, कलावंतांना आपण आजपर्यंत पुरस्कार दिले. यावर्षीचा पुरस्कार त्याआधारेच दिला जाणार आहे. त्याची निवड लवकरच आपण करावी असे मत मांडले. तर मुकुंददादा देसाई म्हणाले की, महागोंड येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात नाम.हसन मुश्रीफ यांनी या स्मारकासाठी दोन कोटी रुपये निधी घोषित केला होता. त्याचा पाठपुरावा करून स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल असे बघावे.

प्रा. मीना मंगळूरकर,कॉ. संजय घाटगे, विक्रम देसाई, संजय तरडेकर, काशिनाथ मोरे, पत्रकार कृष्णा सावंत, पत्रकार रणजित कालेकर, रोहित शेंडे, अमित सामंत, शिवाजी गुरव इत्यादी उपस्थित होते.

सुरवातीला डॉ.नवनाथ शिंदे यांनी इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रध्दांजलीचा ठराव मांडला. त्यांना श्रद्धांजली अर्पण करून बैठक सुरू झाली.

  **यावर्षीच्या पुरस्काराबद्दल कांही नावाची चर्चा झाली पण अंतिम निर्णय बुधवार दि १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता जनता बँक,आजरा येथे होणाऱ्या समितीच्या व्यापक बैठकीत घेण्याचा निर्णय झाला.*


लोकशाहीर द.ना.गव्हाणकर स्मारकासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय
Total Views: 37