बातम्या

डी. वाय. पाटील आर्किटेक्चर प्रदर्शन १५ पासून

D y patil arctecar


By nisha patil - 10/4/2026 3:06:07 PM
Share This News:



 डी. वाय. पाटील आर्किटेक्चर प्रदर्शन १५ पासून

 विद्यार्थ्यांसाठी आर्किटेक्चर क्षेत्राची सुवर्णसंधी

3D मॉडेल्स व नाविन्यपूर्ण डिझाईन्सचे आकर्षण

कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे १५ व १६ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांच्या विविध आर्किटेक्चरल डिझाईन्सचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत होणाऱ्या या प्रदर्शनात आर्किटेक्चरल डिझाईन, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, ग्राफिक्स, इंटिरियर व अर्बन डिझाईन तसेच अंतिम वर्षातील प्रोजेक्ट्सचे ड्रॉइंग्स व मॉडेल्स सादर केले जाणार आहेत.

बारावी उत्तीर्ण होऊन आर्किटेक्चर क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरणार असून, 3D प्रिंटरचा वापर, आधुनिक सॉफ्टवेअर्स आणि व्हॅल्यू एडेड कोर्सेसमधून तयार झालेले नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट्स हे मुख्य आकर्षण असणार आहेत.

१५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता आर्किटेक्ट सतीशराज जगदाळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, १६ एप्रिल रोजी आर्किटेक्ट अभिषेक नाईक व साकिब मुल्ला यांचे मार्गदर्शनपर सेमिनार आयोजित करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थी व पालकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी केले आहे.


डी. वाय. पाटील आर्किटेक्चर प्रदर्शन १५ पासून
Total Views: 24