शैक्षणिक
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात
By nisha patil - 1/7/2025 10:36:04 PM
Share This News:
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात
तळसंदे, १ जुलै: तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा पाचवा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी “विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,” असे आवाहन केले.
कार्यक्रमात ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ. के. प्रथापन, डॉ. आर. के. शर्मा, डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. जे. ए. खोत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम, एआयचा वापर, जागतिक इंटर्नशिप संधी, आणि १०,००० विद्यार्थी संख्या गाठण्याचे उद्दिष्ट यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभदा यादव व प्रा. शिवानी जंगम, तर आभार डॉ. शिवानंद शिरकोळे यांनी मानले.
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात
|