बातम्या

“दबंग की दादागिरी?” – फलटण ग्रामीणचे PSI गोपाळ बदनेचे धक्कादायक कारनामे उघडकीस!

Dabangg or Dadagiri


By nisha patil - 10/30/2025 5:06:22 PM
Share This News:



दबंग की दादागिरी?” – फलटण ग्रामीणचे PSI गोपाळ बदनेचे धक्कादायक कारनामे उघडकीस!

फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचा उपनिरीक्षक गोपाळ बदने हा स्वतःची “दबंग अधिकारी” अशी प्रतिमा तयार करण्यासाठी वादग्रस्त कारवायांमध्ये गुंतल्याचे उघड झाले आहे. साखर कारखान्यांची वसुली, नागरिकांशी हुज्जत, पोलिस सिंडिकेटचे आरोप यावर आता सोशल मीडियावरचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरने बदनेवर चार वेळा अत्याचाराचा आरोप केल्यानंतर त्याला अटक झाली आहे. त्यानंतर त्याचे जुने कारनामे समोर येत असून, सोलापुरातही त्याच्यावर विनयभंगाची तक्रार नोंदवली गेली होती. बदने हा पोलिस स्टेशनमधील सर्व व्यवहार पाहत होता, अशीही चर्चा खात्यात सुरू आहे.

त्याच्यावर गांजा तस्करांशी संबंध असल्याच्या कुजबुजाही सुरु असून, समाजमाध्यमांवर गाड्या अडवून तपासणी करताना त्याला नागरिकांनी धारेवर धरल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

👉 एका दबंग अधिकाऱ्याची पोलिसी प्रतिमा आता चौकशीच्या भोवऱ्यात!


“दबंग की दादागिरी?” – फलटण ग्रामीणचे PSI गोपाळ बदनेचे धक्कादायक कारनामे उघडकीस!
Total Views: 42