बातम्या

दादांच्या हिंदी अन् बोलण्याच्या शैलीनं घोळ – अजित पवारांना रोहित पवारांची पाठराखण

Dadas Hindi and speaking style are a problem

By nisha patil - 10/9/2025 4:39:26 PM
Share This News:

दादांच्या हिंदी अन् बोलण्याच्या शैलीनं घोळ – अजित पवारांना रोहित पवारांची पाठराखण

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आले असून, पक्ष कार्यालयाने यामागे त्यांचे आजारपण कारणीभूत असल्याचे सांगितले. मात्र या घडामोडींना वेगळे वळण मिळाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी अजित पवारांवर मिडीया ट्रायल सुरू असल्याचा आरोप केला. त्यांनी स्पष्ट केले की, काही सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून अजित पवारांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ही चर्चा कुर्डू येथील अवैध खनिज उत्खनन प्रकरणाशी तसेच एका महिला आयपीएस अधिकाऱ्याशी झालेल्या वादाशी जोडली जात आहे. या वादाबाबत अजित पवार यांनी आधीच दिलगीरी व्यक्त केली आहे.

दादांच्या हिंदी अन् बोलण्याच्या शैलीनं घोळ – अजित पवारांना रोहित पवारांची पाठराखण
Total Views: 56