ताज्या बातम्या
कुटवाडच्या नृसिंह पथकाने फोडली युवाशक्तीची दहीहंडी
By nisha patil - 8/25/2025 1:18:00 PM
Share This News:
कुटवाडच्या नृसिंह पथकाने फोडली युवाशक्तीची दहीहंडी; ३८ फुटी थराला गवसला यश
तारा न्यूज नेटवर्क | कोल्हापूर | 25 ऑगस्ट 2025
कोल्हापूरच्या दसरा चौक मैदानात उसळलेल्या उत्सवात कुटवाड (ता. शिरोळ) येथील 'नृसिंह गोविंदा पथक'ाने १७ व्या धनंजय महाडिक युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेत बाजी मारली. तब्बल ३८ फूट उंचीवर असलेली दहीहंडी फोडत त्यांनी तीन लाखांचे पारितोषिक पटकावले.
शाळकरी राजवर्धन पाटील याने अंतिम क्षणी हंडी फोडत मैदानात उपस्थित हजारो प्रेक्षकांची मने जिंकली. सुरुवातीला दुसऱ्या फेरीत संधी हुकली असली, तरी नंतरच्या 'लकी ड्रॉ'मध्ये नृसिंह पथकाची निवड झाली आणि संपूर्ण मैदानात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
दहीहंडी फोडण्याच्या क्षणी सात थरांची उत्कृष्ट रचना करत त्यांनी सांघिक एकतेचे दर्शन घडवले. थर रचताना प्रत्येक क्षण श्वास रोखून ठेवणारा होता. शेवटी कळसावर चढलेल्या राजवर्धनने साडेनऊच्या सुमारास हंडी फोडली.
कार्यक्रमादरम्यान खासदार धनंजय महाडिक व अरुंधती महाडिक यांचा ‘लोकमत कोहिनूर पुरस्कार’ मिळाल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी तासगावचे शिवनेरी, रत्नागिरीचे जय भवानी नेताजी पालकर, संघर्ष ग्रुप आणि गडहिंग्लजचे शिवगर्जना या पथकांनीही दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. काही पथकांनी सहाव्या थरापर्यंत मजल मारत आपली क्षमता सिध्द केली.
कुटवाडच्या नृसिंह पथकाने फोडली युवाशक्तीची दहीहंडी
|