बातम्या
सीपीआर प्रवेशद्वारावर दररोज गोंधळ; नातेवाईकांचा संताप वाढला
By nisha patil - 9/15/2025 2:45:36 PM
Share This News:
सीपीआर प्रवेशद्वारावर दररोज गोंधळ; नातेवाईकांचा संताप वाढला
कोल्हापूरसह सांगली, सातारा, तळकोकणातील रुग्णांचा आधारवड असलेला सीपीआर दिवसेंदिवस गैरसोयींनी त्रस्त करत आहे.
अंतर्गत कामे रुग्ण व नातेवाईकांना सतावत आहेत. प्रवेशद्वारावर आत जाण्यासाठी नातेवाईक दररोज हुज्जत घालत आहेत. सर्किट बेंच सुरू झाल्याने प्रशासनाने परिसर ‘नो हॉकर्स, नो पार्किंग झोन’ केला आहे.
शेकडो वाहनं थांबतात आणि गर्दी वाढते. सुरक्षा जवानांशी नातेवाईक दररोज वाद घालत आहेत.
अॅडमिट रुग्णांची काळजी घेण्याऐवजी नातेवाईक गोंधळात अडकतात. परिसरातील वाढता तणाव सीपीआरला संवेदनशील बनवत आहे.
सीपीआर प्रवेशद्वारावर दररोज गोंधळ; नातेवाईकांचा संताप वाढला
|