बातम्या
दैनंदिन वस्तू होणार आता स्वस्त..सर्वसामान्यांचा दिलासा
By nisha patil - 4/9/2025 3:32:50 PM
Share This News:
दैनंदिन वस्तू होणार आता स्वस्त..सर्वसामान्यांचा दिलासा
दैनंदिन वस्तू स्वस्त – महागड्या गाड्या महाग
जीएसटी परिषदेच्या बैठकीत सामान्य नागरिकांना दिलासा देणारे निर्णय झाले आहेत. आता जीएसटी सोप्या स्वरूपात लागू होणार असून फक्त दोन मुख्य दर राहतील – दैनंदिन वस्तूंवर ५% आणि इतर बहुतेक वस्तूंवर १८%. तर तंबाखू, पान मसाला, महागड्या गाड्या अशा लक्झरी व पाप वस्तूंवर थेट ४०% कर लावला जाणार आहे.
या निर्णयामुळे १७५ दैनंदिन वापराच्या वस्तू जसे की साबण, पेस्ट, शॅम्पू आता स्वस्त होणार आहेत. टीव्ही, एसीसारखी इलेक्ट्रॉनिक्स आणि लहान पेट्रोल हायब्रिड गाड्याही कमी जीएसटीमुळे स्वस्त होतील.
पण, ३८ लाख रुपयांपेक्षा महाग इलेक्ट्रिक गाड्या आणि लक्झरी वस्तूंवर ४०% कर लागू झाल्याने त्या वस्तू आणखी महाग होणार आहेत.
एसबीआय रिसर्चनुसार, या बदलांमुळे राज्य सरकारांना जास्त महसूल मिळणार असून, विकासासाठी ₹१४ लाख कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध होईल.
दैनंदिन वस्तू होणार आता स्वस्त..सर्वसामान्यांचा दिलासा
|