बातम्या
दाजीपूर अभयारण्य जंगल सफारी अनिश्चित काळासाठी बंद.
By nisha patil - 5/26/2025 4:43:31 PM
Share This News:
दाजीपूर अभयारण्य जंगल सफारी अनिश्चित काळासाठी बंद.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय .राधानगरी तालुक्यातही पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी दाजीपूर अभयारण्य परिसर पर्यटकांसाठी बंद करण्यात आलंय. अभयारण्यातील जंगल सफारी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे जंगल सफारीच्या रोडला प्रचंड चिखल झाला आहे. त्यामुळे वाहने आत मध्ये जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. दरवर्षी एक ते पाच जून दरम्यान दाजीपूर अभयारण्य पर्यटनासाठी बंद होते. मात्र यंदा आठवडाभर आधी जंगल सफारी बंद झालेली आहे.
दाजीपूर अभयारण्य जंगल सफारी अनिश्चित काळासाठी बंद.
|