बातम्या
नृसिंहवाडीत चढता दक्षिणद्वार सोहळा
By nisha patil - 8/19/2025 11:59:38 AM
Share This News:
कृष्णा-पंचगंगा नदीच्या पुरामुळे नृसिंहवाडी दत्तमंदिरात ‘चढता दक्षिणद्वार सोहळा’
गाभाऱ्यातील श्रींच्या पादुकांना नदीपाण्याचा स्पर्श; भक्तिमय वातावरणात चौथा सोहळा संपन्न
कोयना व राधानगरी धरणातून सुरू झालेल्या प्रचंड विसर्गामुळे कृष्णा व पंचगंगा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. या नैसर्गिक घडामोडीचा थेट परिणाम नृसिंहवाडी येथील श्री क्षेत्र दत्तमंदिरावर झाला असून, मंदिर परिसर पाण्याने वेढला गेला आहे.
मंगळवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता यंदाच्या वर्षातील चौथा चढता दक्षिणद्वार सोहळा भक्तिभावात पार पडला. कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी तब्बल सहा फूटांनी वाढल्याने नदीचे पाणी मंदिराच्या उत्तरद्वारातून आत प्रवेश करून गाभाऱ्यातील श्रींच्या पवित्र पादुकांना स्पर्श करत दक्षिणद्वारातून बाहेर पडले.
या अद्भुत नैसर्गिक सोहळ्याला ‘दक्षिणद्वार सोहळा’ असे संबोधले जाते. या वेळी परिसरात भक्तिमय वातावरण पसरले होते, तर अनेक भाविकांनी या दुर्मिळ दृश्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याचा लाभ घेतला.
नृसिंहवाडीत चढता दक्षिणद्वार सोहळा
|