बातम्या

राजाराम तलावावर लूटमार करणाऱ्या ‘दम मारो दम गँग’ला मोका! ५ जण पोलिसांच्या जाळ्यात

Dam Maro Dam gang


By nisha patil - 4/11/2026 3:08:34 PM
Share This News:



राजाराम तलावावर लूटमार करणाऱ्या ‘दम मारो दम गँग’ला मोका! ५ जण पोलिसांच्या जाळ्यात

राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजाराम तलाव परिसरात नागरिकाला मारहाण करून सोन्याची साखळी लुटणाऱ्या ‘दम मारो दम गँग’ या संघटित गुन्हेगारी टोळीवर कोल्हापूर पोलिसांनी मोका कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत. राजाराम तलाव परिसरात या टोळीने एका नागरिकाला मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरीने लुटली होती. या गंभीर घटनेनंतर राजारामपुरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत पाच जणांना अटक केली. तसेच गुन्ह्यातील मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.

सदर संशयितांची संघटित गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांची पूर्वपरवानगी मिळाल्यानंतर या टोळीविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, शहरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत. नागरिकांनी अशा गुन्हेगारांची माहिती निर्भयपणे पोलिसांना द्यावी, असे आवाहनही कोल्हापूर पोलिसांनी केले आहे.


राजाराम तलावावर लूटमार करणाऱ्या ‘दम मारो दम गँग’ला मोका! ५ जण पोलिसांच्या जाळ्यात
Total Views: 10