बातम्या
हत्तीवडे ता. आजरा येथील वाण्याचे शेत या ठिकाणी दुपारी दीड वाजता गव्याचे दर्शन*
By Administrator - 12/16/2025 6:08:11 PM
Share This News:
हत्तीवडे ता. आजरा येथील वाण्याचे शेत या ठिकाणी दुपारी दीड वाजता गव्याचे दर्शन*
आजरा(हसन तकीलदार):-आज दुपारी एक दीडच्या सुमारास हत्तीवड्याचे पोलीस पाटील विजय मारुती पाटील शेताकडे जात असताना रस्त्यातच वाण्याचे शेत येथे गव्या रेड्याचे दर्शन झाले.
विजय पाटील हे दुपारी आपल्या शेताकडे जात असताना अचानक गवा रेडा रस्त्यावर आला. हुसकावण्याचा प्रयत्न केला परंतु हा गवा आजारी असल्याची लक्षणे त्यांना दिसली. तेव्हा विजय पाटील यांनी तात्काळ वनखात्याशी संपर्क साधला. वानखत्याच्या पाटील मॅडम यांनी लगेचच घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी त्यांनी निरीक्षण केले असता गाव्याची दृष्टी मंदावली असल्याचे जाणवले. अन्न, पाणी मिळाले नसल्याने व आजारी असल्याने त्याचे डोळे मंदावले असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. हा गवा जादा हलचाल करीत नव्हता, थोडे आंतर चालायचा आणि बसायचा असे प्रत्यक्ष दर्शनी विजय पाटील यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना सांगितले.a
हत्तीवडे ता. आजरा येथील वाण्याचे शेत या ठिकाणी दुपारी दीड वाजता गव्याचे दर्शन*
|