बातम्या

‘डॅशबोर्ड प्लॅन’ फसला! 1.90 कोटींची चोरी उघड

Dashboard plan fails Theft of Rs 1 90 crores exposed


By nisha patil - 6/17/2025 9:33:39 PM
Share This News:



‘डॅशबोर्ड प्लॅन’ फसला! 1.90 कोटींची चोरी उघड

एलसीबीच्या सापळ्यात कोटींचे चोर गजाआड

गांधीनगर, कोल्हापूर येथे 13 जून 2025 रोजी टेम्पोच्या डॅशबोर्डमधून 1.90 कोटी रुपयांची रोकड चोरी झाल्याची घटना घडली. या गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घेतला. तपासात गुन्हा योगेश पडळकर, स्वरूप शेळके, स्वयंम सावंत (गोटया), सम्राट शेळके व एका अल्पवयीन आरोपीने एकत्र मिळून केल्याचे उघड झाले. स्वरूप शेळके हा संबंधित व्यापाऱ्याचा कर्मचारी होता आणि त्याच्याकडूनच पैशांची माहिती आरोपींना मिळाली होती.

मध्यरात्री गुन्हेगारांनी गुडलक स्टेशनरीच्या कंपाउंडचा पत्रा उचकटून टेम्पोची काच फोडली आणि डॅशबोर्डमधील पांढऱ्या पोत्यातील रोकड चोरून नेली. पोलिसांनी सापळा रचून सर्व आरोपींना अटक केली असून, 1.70 कोटी रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
 


‘डॅशबोर्ड प्लॅन’ फसला! 1.90 कोटींची चोरी उघड
Total Views: 96