बातम्या
कोल्हापूर : तटाकडील दत्त मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन
By nisha patil - 5/20/2025 2:22:41 PM
Share This News:
कोल्हापूर : तटाकडील दत्त मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन
आ. राजेश क्षीरसागर व अध्यक्ष महेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर, २० मे – कोल्हापूर शहरातील तटाकडील तालीम मंडळाच्या दत्त मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याचा शुभारंभ कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर आणि तालीम मंडळाचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित महाप्रसादाचे वाटप शिवसेनेचे युवा नेते ऋतुराज क्षीरसागर आणि अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राजू मेवेकरी, तालमीचे सेक्रेटरी राजेंद्र जाधव, अशोक देसाई, अजित चव्हाण, संभाजी साळोखे, राहुल इंगवले, विवेक महाडिक, सुनील पाटील, भरत काळे, राजू मोरे, गिरीष साळोखे, अमोल पालोजी, श्याम जोशी, सतीश अंबर्डेकर यांच्यासह तालमीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— मा. महेश बाळासाहेब जाधव
जनसंपर्क कार्यालय, कोल्हापूर
कोल्हापूर : तटाकडील दत्त मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन
|