बातम्या
मंजूर झालेल्या जागेची अंमलबजावणी तात्काळ करा- दत्ता मिसाळ.
By nisha patil - 10/5/2026 5:19:44 PM
Share This News:
*मंजूर झालेल्या जागेची अंमलबजावणी तात्काळ करा- दत्ता मिसाळ.*
*दि.०८\मे\२०२६- कोल्हापूर प्रतिनिधी-शेवंताबाई महिला निवारा चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने वंचित असाय्य महिलांना निवारा मिळण्यासाठी अनेक वर्ष सातत्याने ही संस्था तसेच रिपब्लिकन सेना प्रयत्न करत आहे संबंधित जागा ही या संस्थेस मंजूर झाले
असून शासन या ठिकाणी अनेक राजकारण्यांच्या सांगण्यावरून संबंधित जागा या असहाय निराधार महिलांना जाणून-बुजून ताबा देत नाहीये प्रशासन या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष करत असून संबंधित मंजूर झालेली जागेची तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा या दिनदलित असाय्य महिलांचा उद्रेक पाहायला मिळेल असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष आयु. दत्ता मिसाळ तसेच रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव आयु. सतीश माळगे यांनी जिल्हा प्रशासनाला दिला ते जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या दारात निदर्शने करतेवेळी बोलत होते जोपर्यंत हा लढा यशस्वी होत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचा पाठिंबा आपल्यासोबत सदैव राहील असेही ते पुढे म्हणाले यावेळी नूतन जिल्हाधिकारी मा. राठोड साहेब यांना या मंजूर झालेल्या जागेची अंमलबजावणी करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
सदरचे आंदोलन रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष जितेंद्र कांबळे, तसेच रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव आयु.सतीश माळगे (दादा), रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आयु.जितेंद्र कांबळे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख आयु.राजेंद्र कांबळे, सल्लागार राजेंद्र कामत यांच्यासह असाय्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
मंजूर झालेल्या जागेची अंमलबजावणी तात्काळ करा- दत्ता मिसाळ.
|