राजकीय

सांगलीत दत्तात्रय सावंत यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा ; गणपती मंदिरात फोडला नारळ

Dattatray Sawant kicks off his election

By nisha patil - 10/13/2026 11:10:09 PM
Share This News:

सांगलीत दत्तात्रय सावंत यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा ; गणपती मंदिरात फोडला नारळ

​सांगली (प्रतिनिधी) : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले असून, सांगली येथे माजी आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांच्या प्रचाराचा नारळ येथील प्रसिद्ध गणपती मंदिरात उत्साहात फोडण्यात आला.

​पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता प्रचारात आघाडी घेतली आहे. संपूर्ण पाचही जिल्ह्यांमध्ये प्रचाराची धुरा अत्यंत सक्षमपणे सांभाळण्यात आली असून, मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला जात आहे.

​"शिक्षकांचा आमदार शिक्षकच झाला पाहिजे आणि शिक्षकांची चळवळ टिकून राहिली पाहिजे," अशी ठाम भूमिका यावेळी उपस्थित शिक्षक व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

सांगलीत दत्तात्रय सावंत यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा ; गणपती मंदिरात फोडला नारळ
Total Views: 10