बातम्या

कोल्हापूर परिमंडलातील ३४,१६१ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा – सौर कृषी वाहिनी योजनेचा मोठा लाभ!

Daytime electricity supply to 34161

By nisha patil - 6/21/2025 11:20:49 PM
Share This News:

कोल्हापूर परिमंडलातील ३४,१६१ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा – सौर कृषी वाहिनी योजनेचा मोठा लाभ!

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात एकूण २० सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून १०२ मेगावॅट सौर वीज निर्मिती होत आहे.
या प्रकल्पांमुळे ३४,१६१ शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी वीज मिळत आहे.

  • कोल्हापूर जिल्ह्यातील ९ प्रकल्प कार्यान्वित – १३,१३५ शेतकरी लाभार्थी

  • सांगली जिल्ह्यातील ११ प्रकल्प कार्यान्वित – २१,०२६ शेतकरी लाभार्थी

या प्रकल्पांतून सौर ऊर्जेचा वापर करून कमी दाबाच्या तक्रारी दूर होणार असून पर्यावरणपूरक, रोजगारनिर्मिती साधणारे व वीज दर कमी करण्यास मदत करणारे हे प्रकल्प ठरत आहेत.

– तारा न्यूज, कोल्हापूर

कोल्हापूर परिमंडलातील ३४,१६१ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा – सौर कृषी वाहिनी योजनेचा मोठा लाभ!
Total Views: 95