बातम्या
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
By nisha patil - 9/16/2025 3:44:18 PM
Share This News:
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
कोल्हापूर, दि. 16 : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2022-23 ते 2024-25 या कालावधीतील विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित आहेत. प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरिता दि. 30 सप्टेंबर 2025 अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीनंतर केंद्र हिस्सा 60 टक्के वितरणाकरिता DBT पोर्टलद्वारे NSP पोर्टलवर डेटा स्वीकारला जाणार नाही त्यामुळे प्रलंबित अर्ज निकाली काढावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
महाडीबीटी पोर्टलद्वारे राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे सन 2019-20 ते 2024-25 या कालावधीतील सर्व योजनांचे अद्यापही महाविद्यालय स्तरावर मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित आहेत. या अनुषंगाने महाडिबीटी तांत्रिक कक्षामार्फंत विद्यार्थी स्तरावरील अर्ज महाविद्यालय लॉगीनमध्ये Scrutiny या पर्यायामध्ये उपलब्ध केलेले आहेत. प्रलंबित अर्ज दि.22 सप्टेंबर 2025 पर्यंत निकाली काढण्याकरिता मंजूर किंवा नामंजूर असे दोनच पर्याय प्रणालीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
प्रलंबित अर्जांवर महाविद्यालय स्तरावरुन खालीलप्रमाणे कार्यवाही करावी-
यामध्ये विद्यार्थी स्तरावरील Re-Apply करण्याची मुदत संपली असल्याने अर्जांमध्ये काही त्रृटी आढळल्यास त्रृटी पुर्तता करण्यास्तव विद्यार्थी स्तरावर अर्ज रिव्हर्ट बॅक न करता महाविद्यालय लॉगीनमधून त्रृटी पुर्तता पुर्ण करुन (आवश्यक असलेले दस्ताऐवज महाविद्यालय लॉगीन मधून अपलोड करुन) अर्ज निकाली काढावेत. त्याचप्रमाणे जे अर्ज योजनेच्या निकषांनुसार अपात्र आहेत असे अर्ज महाविद्यालय स्तरावरुन कारणमीमांसासह नमूद करुन थेट नामंजूर (Reject) करावेत.
महाविद्यालय किंवा जिल्हा स्तरावरुन नामंजूर (Reject) होतील असे अर्ज ऑफलाईन अन्वेषण प्रक्रियेकरिता ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. राज्य शासनाने सूचित केल्यानुसार उपरोक्त चारही योजनांचे सन 2019-20 ते 2022-23 या कालावधीतील महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरिता अंतिम मुदतवाढ दि. 22 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे.
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
|