ताज्या बातम्या

ऐन सणासुदीत तोंडचा घास काढून घेणाऱ्या विरोधकांना लाडक्या बहिणी अद्दल घडवतील.....!मंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा

Dear sisters will bring justice to the opposition who are taking away the food from their mouths during the festive season  Minister Hasan Mushrifs warning


By nisha patil - 1/13/2026 6:05:21 PM
Share This News:



कोल्हापूर, दि. १३: 
महायुती सरकारकडून मकर संक्रात सणाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे ॲडव्हान्स, असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये अनुदान एकत्र दिले जाणार होते. विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे निवडणूक काळात या दोन्हीही महिन्यांचे पैसे देऊ नयेत, अशी आचारसंहिता भंगाची तक्रार केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने फक्त डिसेंबरचेच अनुदान द्या व  जानेवारीचे नंतर द्या, असा आदेश दिला. त्यामुळे संक्रातीच्या सणाला दोन महिन्यांचे एकत्रित मिळणारे पैसे लाडक्या बहिणींना मिळाले नाहीत. या पद्धतीने लाडक्या बहिणींच्या तोंडचा घास काढून घेतला. ऐन सणासुदीच्या तोंडावर तोंडचा घास काढून घेणाऱ्या दुष्ट विरोधकांना लाडक्या बहिणी या निवडणुकीत हिसका दाखवून अद्दल घडवतील, असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.   

          
प्रभाग क्रमांक १८ मध्ये शास्त्रीनगर येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर प्रचारसभेत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. व्यासपीठावर खासदार धनंजय महाडिक, सामाजिक कार्यकर्ते संताजीबाबा घोरपडे आदी प्रमुख उपस्थित होते.            
         
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, तोंडावर आलेली भोगी, संक्रात आणि किंक्रात अशा तिहेरी सणाचा योग साधत सरकारने सबंध महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना ही संक्रातीची भेट देण्याचे नियोजन केले होते. ऐन सणासुदीच्या तोंडावरच लाडक्या बहिणींच्या तोंडचा घास हिरावणाऱ्या काँग्रेस पक्षाला लाडक्या बहिणी हिसका दाखविणारच.
         
भोग सरल सुख येईल.......!
श्री. मुश्रीफ म्हणाले, या सणासुदीच्या दोन हप्त्यांच्या रूपाने आमच्या माता-भगिनींचा "भोग सरल..... सुख येईल......!" अशी आमची भावना होती.
परंतु; विरोधकांच्या नाकर्त्या आणि आडमुठ्या भुमिकेमुळे आमच्या लाडक्या बहिणींचे दुःख, भोग तसेच राहिले आहेत.  त्या निश्चितच विरोधकांना मताच्या रूपाने हिसका दाखवतील. भविष्यात लाडक्या बहिणीला दरमहा २१०० रुपये देऊन ही गोष्ट आम्ही भरून काढल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे महायुतीला सत्ता द्या, "भोग सरल सुख येईल..." या गाण्याच्या ओळीही श्री. मुश्रीफ यांनी म्हटल्या.
.................
     
कोल्हापूर: कोल्हापूर महापालिका निवडणूकीमध्ये प्रभाग क्रमांक १८ मध्ये प्रतिभानगर येथे  महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभांमधून बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक व उपस्थित नागरिक


ऐन सणासुदीत तोंडचा घास काढून घेणाऱ्या विरोधकांना लाडक्या बहिणी अद्दल घडवतील.....!मंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा
Total Views: 33