राजकीय

दशकभराची वैर संपलं; घाटगे–मुश्रीफ एकाच व्यासपीठावर, विरोधकांत खळबळ

Decade long enmity ends


By nisha patil - 11/30/2025 12:19:24 PM
Share This News:



कोल्हापूर — कागलच्या राजकारणात दशकभर रुतलेला वैर एका क्षणात वितळत, समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ एकाच व्यासपीठावर येताच जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानंतर ही अनपेक्षित युती जुळल्याचे घाटगे यांनी सार्वजनिकरीत्या मान्य केले असून, “आम्हाला एकत्र आणल्याने विरोधकांचीच घालमेल वाढली आहे,” अशा शब्दांत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर चिमटा काढला.

या जुळणीमुळे कार्यकर्त्यांत मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहीजण याला विकासाच्या दिशेने ‘धाडसी पाऊल’ म्हणत तर काहीजण याला खुलेआम ‘राजकीय विश्वासघात’ ठरवत आहेत. कागल-कोल्हापूरमधील सत्ता संतुलन बदलण्याची क्षमता या नव्या समीकरणात दिसत असून, आगामी नगरपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता वेगळ्याच रंगात सुरुवात होणार, हे निश्चित झाले आहे.

राजकीय धुरळा खाली बसल्यानंतरच मतदार या अनपेक्षित मैत्रीला किती प्रमाणात स्वीकारतात, आणि या नव्या शक्ती-समीकरणाचा निकाल पेटीवर कसा उमटतो, हे पाहणे तितकेच रोचक ठरणार आहे.


दशकभराची वैर संपलं; घाटगे–मुश्रीफ एकाच व्यासपीठावर, विरोधकांत खळबळ
Total Views: 15