ताज्या बातम्या

📰 ओंकार हत्ती वनतारा केंद्रात हलविण्याचा निर्णय कायम — कोल्हापूर सर्किट बेंचचा निकाल

Decision to move Omkar elephant to Vantara centre upheld


By nisha patil - 11/13/2025 11:17:14 AM
Share This News:



कोल्हापूर:-  मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने आज महत्त्वपूर्ण निकाल देत सिंधुदुर्गमधील जंगली हत्ती ‘ओंकार’ याला गुजरातमधील न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, हत्तीच्या आरोग्य आणि योग्य देखभालीसाठी वन विभागाने आवश्यक ती काळजी घ्यावी, तसेच पुढील निर्णयासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी असे निर्देश दिले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगल परिसरात काही वर्षांपासून ओंकार या हत्तीमुळे भीतीचे वातावरण होते. त्याच्या हालचालींमुळे शेती, घरं आणि जनावरांचं नुकसान झाल्याची तक्रार नागरिकांनी वारंवार केली होती. त्यानंतर वन विभागाने त्याला पकडून तात्पुरत्या देखरेखीखाली ठेवले होते.

पर्यावरणप्रेमी संघटनांनी मात्र या स्थानांतरणाच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. ओंकारला त्याच नैसर्गिक अधिवासात ठेवून उपचार व पुनर्वसन करावं, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. मात्र सर्किट बेंचने सर्व बाजू ऐकल्यानंतर वन विभागाचा निर्णय योग्य असल्याचे मत नोंदवले.

या निर्णयामुळे आता ओंकारला गुजरातमधील वनतारा प्राणी संगोपन केंद्रात नेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. दरम्यान, या निकालानंतर स्थानिक पर्यावरण कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून पुढील न्यायिक पर्यायांचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.



📰 ओंकार हत्ती वनतारा केंद्रात हलविण्याचा निर्णय कायम — कोल्हापूर सर्किट बेंचचा निकाल
Total Views: 69