बातम्या

उद्या निघणाऱ्या शिक्षण यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय*

Decision to participate in large


By Administrator - 2/25/2026 3:46:11 PM
Share This News:



उद्या निघणाऱ्या शिक्षण यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय*
 

आजरा(हसन तकीलदार)-:-आजरा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिक्षण यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा सुनील शिंत्रे होते. यावेळी कॉ संपत देसाई,प्रा. नवनाथ शिंदे, युवराज पवार, संभाजी बापट, देवदास बोलके, विक्रम देसाई, कॉ.शांताराम पाटील, दशरथ घुरे यांची प्रमुख उपस्थित होती.

 सुरुवातीला शिक्षण हक्क यात्रेचे निमंत्रक कॉम्रेड संपत देसाई यांनी आंदोलनामागील भूमिका सांगून हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहू या असे आवाहन केले. प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी आंदोलनाच्या तयारीत आपण सर्वांनी तन-मन-धन अर्पण करून उतरावे असे सांगितले.उद्या सुरू होणारी ही यात्रा कोल्हापुरात २८ रोजी पोहोचेल. तिथे शिक्षण परिषदेने या यात्रेची सांगता होईल.

 यावेळी संभाजी बापट,उमाजी कुंभार, एकनाथ गिलबिले, रामदास मोरवाडकर यांनीही काही सूचना केल्या.उद्या होणाऱ्या यात्रेत तालुक्यातील सर्व शाळा व्यवस्थापन समितीने या सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले.
उद्या चंदगड येथून शिक्षण हक्क यात्रा इथे आल्यानंतर ठीक १ वाजता छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून तहसील कार्यालयावर जाईल असे सांगण्यात आले.


उद्या निघणाऱ्या शिक्षण यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय*
Total Views: 198