बातम्या
धामणी प्रकल्पांतर्गत पुनर्वसित वसाहतींच्या नागरी सुविधांचे लोकार्पण
By nisha patil - 4/21/2025 3:45:03 PM
Share This News:
धामणी प्रकल्पांतर्गत पुनर्वसित वसाहतींच्या नागरी सुविधांचे लोकार्पण
ना. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नागरी सुविधांचा उद्घाटन सोहळा संपन्न
धामणी मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पडसाळी, राई, राई-1 व राई-2 वसाहतीमधील नव्या नागरी सुविधांचा लोकार्पण सोहळा ना. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पार पडला.यावेळी त्यांनी सांगितले की, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन नियोजित वेळेत पार पडत असून, पंचक्रोशीतील पाणीटंचाई दूर होणार आहे. नागरिकांना धरणाचे काम सुरू होण्यापूर्वीच योग्य सुविधा मिळाल्या आहेत.
या कार्यक्रमात बसथांबा, प्राथमिक शाळा, स्मशान शेड, ग्रामपंचायत इमारत, समाज मंदिर, व पाणीपुरवठा आदी सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास अरुणराव जाधव, अभिजित म्हेत्रे, श्री. खाडे, प्रसाद चौगुले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धामणी प्रकल्पांतर्गत पुनर्वसित वसाहतींच्या नागरी सुविधांचे लोकार्पण
|