बातम्या
‘बेडूक भाई’ दीपक पाटकर मंगळवारी रेल्वे धडकीत ठार”
By nisha patil - 8/10/2025 6:13:24 PM
Share This News:
‘बेडूक भाई’ दीपक पाटकर मंगळवारी रेल्वे धडकीत ठार”
मधुरा रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. सावंतवाडी येथील पाड लोस येथील बहिणीला भेटायला जात असलेला ३५ वर्षीय दीपक विठ्ठल पाटकर रेल्वे रूळ ओलांडताना भरधा वेगाने आलेल्या मंगला एक्सप्रेसच्या धडकेत जागीच ठार झाला.
सावंतवाडी समाज मंदिर परिसरात राहणारा दीपक विगत अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत होता. सोशल मीडियावर त्याने ‘बेडूक भाई’ या नावाने रील्स तयार करीत लोकांना हसवण्याचे काम केले. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर त्याने एक व्हिडिओही तयार केला होता, ज्यामध्ये तो लोकांना “आनंदी राहा आणि सर्वांनाही आनंदात राहायला सांगा” असा संदेश देत होता.
दीपकच्या निधनाने स्थानिक समाजात शोककळा पसरली असून, सोशल मीडियावरही त्याच्या चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
‘बेडूक भाई’ दीपक पाटकर मंगळवारी रेल्वे धडकीत ठार”
|