विशेष बातम्या
महिला तपासणी केंद्राच्या मंजुरीत विलंब; सीपीआर डॉक्टर व महिला वकिलांमध्ये तीव्र वाद, प्रकरण ‘विशाखा समिती’कडे
By nisha patil - 11/28/2025 5:33:58 PM
Share This News:
महिला तपासणी केंद्राच्या मंजुरीत विलंब; सीपीआर डॉक्टर व महिला वकिलांमध्ये तीव्र वाद, प्रकरण ‘विशाखा समिती’कडे
महिला वैद्यकीय तपासणी केंद्राच्या मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे देण्यात होत असलेल्या विलंबावरून सीपीआर रुग्णालयातील एका डॉक्टर आणि विशेष समितीतील महिला वकील यांच्यात जोरदार वाद चिघळला. हा वाद थेट पोलिस ठाणे ते वैद्यकीय उपसंचालक कार्यालयापर्यंत पोहोचल्याने सीपीआरमध्ये या चर्चेला मोठी उधाण आले आहे. विशेष म्हणजे, प्रशासकीय यंत्रणेतल्या दोन उच्चशिक्षित व्यक्तींमधील या प्रश्नावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गंभीर दखल न घेतल्याचीही चर्चा आहे.
डॉक्टरांच्या मुलीचे महिला वैद्यकीय तपासणी केंद्र जयसिंगपूर परिसरात सुरू होणार असून, त्यासाठी वैद्यकीय उपसंचालक कार्यालयाची मान्यता आणि जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील विशेष समितीकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र आवश्यक आहे. मात्र समितीकडून दाखला मिळण्यास होत असलेल्या विलंबाबाबत डॉक्टरांनी महिला वकील सदस्यांना जाब विचारताच वातावरण तापले.
घटनेची माहिती महिला वकिलांनी लिखित स्वरूपात सीपीआर प्रशासनाला दिली असून, प्रकरणाची चौकशी ‘विशाखा समिती’कडे सोपवण्यात आली आहे. एका वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून प्राथमिक तपास सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, डॉक्टरांनी अवमानकारक शब्द वापरल्याचा आरोप करत संबंधित महिला वकिलांनी पोलिस ठाण्यातही धाव घेतली; मात्र काही तांत्रिक कारणांमुळे औपचारिक तक्रार नोंदवली गेली नसल्याची माहिती आहे.
महिला तपासणी केंद्राच्या मंजुरीत विलंब; सीपीआर डॉक्टर व महिला वकिलांमध्ये तीव्र वाद, प्रकरण ‘विशाखा समिती’कडे
|