राजकीय

कागल नगरपरिषदेतील कंत्राटी कामगारांना न्याय द्या, अन्यथा तीव्र आंदोलन; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक

Deliver justice to contract workers of Kagal Municipal Council or face


By nisha patil - 9/21/2026 4:27:49 PM
Share This News:



कागल नगरपरिषदेतील कंत्राटी कामगारांना न्याय द्या, अन्यथा तीव्र आंदोलन; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक

कागल प्रतिनिधी अजित बोडके कागल, ता. २१ : कागल नगरपरिषदेत विविध विभागात गेली अनेक वर्षे कंत्राटी आणि रोजंदारी पद्धतीने प्रामाणिक सेवा बजावणाऱ्या कामगारांच्या प्रश्नावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज आक्रमक पवित्रा घेतला आहे.

कंत्राटी कामगारांना 'समान काम, समान दाम' या तत्त्वावर न्याय मिळावा आणि सलग ११ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कामगारांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना शहरप्रमुख मा अजित मोडेकर यांनी मुख्याधिकारी, कागल नगरपरिषद यांना निवेदन दिले.

या निवेदनात ठेकेदारी पद्धतीत पारदर्शकता आणण्याची मागणी करण्यात आली आहे. गोरगरीब, सर्वसामान्य कामगार बंधू-भगिनींना शासकीय नियमानुसार सर्व सोयी-सुविधा मिळाल्याच पाहिजेत, अशी ठाम भूमिका शिवसेनेने मांडली आहे.

निवेदनातील ६ प्रमुख मागण्या :

१. कागल नगरपरिषदेत सध्या कार्यरत असलेल्या सर्व विभागातील कंत्राटी कामगारांची संख्या व नावांची यादी मिळावी.
२. त्या कामगारांना दरमहा किती पगार / मानधन दिले जाते याची सविस्तर माहिती द्यावी.
३. नगरपरिषदेकडे एकूण किती विभागात कंत्राटदारांमार्फत नेमणूक केली आहे याची माहिती द्यावी.
४. कंत्राटदारांकडून कामगारांना शासकीय नियमानुसार ESI, PF, बोनस आणि सुरक्षित साधने यांसारख्या सर्व सोयी-सुविधा दिल्या जातात का, याची माहिती द्यावी.
५. सदर कंत्राटदारांना कोणत्या सालापासून कामगार पुरवठ्याचा ठेका देण्यात आला आहे याची माहिती द्यावी.
६. सर्व ठेकेदारांचे लायसन्स व टेंडरच्या प्रती उपलब्ध करून द्याव्यात.

तसेच, ज्या कामगारांची पालिकेकडे सलग ११ वर्षे सेवा पूर्ण झाली आहे, त्यांची तात्काळ ज्येष्ठता यादी तयार करून त्यांना सेवेत कायम करण्याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कामगारांच्या समस्येवर योग्य तो मार्ग काढावा, अन्यथा शिवसेना पद्धतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मा. संभाजी भोकरे, तालुकाप्रमुख मा. जयसिंग टिकले, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख मा. अशोक पाटील, शहर संघटिका मा. दिपाली घोरपडे, विभाग प्रमुख अजित बोडके, विशाल जाधव, शिवानंद एखंडे, वैभव आडके, अभिजित बोडके, इब्राहिम मुलानी, भीमराव मिरडकर, एकनाथ कांबळे, दीपक कांबळे, संतोष उपासे, नंदकुमार पोतदार, मारुती कुंभार आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


कागल नगरपरिषदेतील कंत्राटी कामगारांना न्याय द्या, अन्यथा तीव्र आंदोलन; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक
Total Views: 11