बातम्या
*आजरा आंबोली रोडवरील मुल्ला कॉलनी जवळील कोपऱ्यावर बस थांब्याची मागणी
By nisha patil - 12/11/2026 10:30:40 PM
Share This News:
*आजरा आंबोली रोडवरील मुल्ला कॉलनी जवळील कोपऱ्यावर बस थांब्याची मागणी
*आजरा(हसन तकीलदार):- सिद्धिविनायक कॉलनी, मुल्ला कॉलनी,लाडजी कॉलनी तसेच कोर्टातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता मुल्ला कॉलनीच्या कोपऱ्यावर विनंती बस थांबा करावा अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर व नगरसेविका सौ. अन्वी अनिरुद्ध केसरकर यांनी आगार प्रमुख पृथ्वीराज चव्हाण यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आजरा एस.टी.डेपोजवळच सिद्धीविनायक, लाडजी, मुल्ला तसेच तकीलदार कॉलनी आहेत. याठिकाणी लोकवस्ती वाढत आहे. वाढत्या नागरिकांच्या संख्येमुळे त्याचप्रमाणे या ठिकाणी आजरा कोर्ट असल्याने बाहेरून व खेडेगावातून कोर्ट कामासाठी येणाऱ्या लोकांची गैरसोय होत असल्याने मुल्ला कॉलनीच्या कोपऱ्यावर बस थांबा व्हावा अशा आशयाचे निवेदन आजरा आगार प्रमुखांना अनिरुद्ध केसरकर व नगरसेविका सौ. अन्वी केसरकर यांनी दिले आहे. यावेळी या कॉलनीतील कार्यकर्तेही उपस्थित होते.
*आजरा आंबोली रोडवरील मुल्ला कॉलनी जवळील कोपऱ्यावर बस थांब्याची मागणी
|