बातम्या
कसबा बावडा-लाईनबझार परिसरात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी..
By nisha patil - 9/17/2025 5:41:20 PM
Share This News:
कसबा बावडा-लाईनबझार परिसरात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी..
“दि कसबा बावडा फाईल्स” पोस्टमुळे नागरिकांचा संताप; पोलीस बंदोबस्ताची मागणी
कसबा बावडा व लाईनबझार परिसरातील शांतता व सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या संदर्भात जिल्हा पोलीस प्रमुखांकडे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात सांगण्यात आले की, "दि कसबा बावडा फाईल्स" या नावाने समाजमाध्यमांवर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या खोट्या व चुकीच्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. यामुळे दसरा, दिवाळी आणि निवडणुकांच्या तोंडावर समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी या पोस्टचा सखोल शोध घेऊन संबंधित समाजकंटकांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच कसबा बावडा व लाईनबझार परिसरातील मंदिरे, धार्मिक व ऐतिहासिक स्थळांवर योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशीही विनंती करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, शहर पोलीस उपअधीक्षक व शाहुपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना देखील देण्यात आल्या आहेत.
कसबा बावडा-लाईनबझार परिसरात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी..
|