ताज्या बातम्या

त्या गरीब मुलाच्या बळीस कारणीभूत असलेल्यांच्यावर करावाईची मागणी

Demand for action against those responsible for the victimization of that poor child


By nisha patil - 1/15/2026 4:45:07 PM
Share This News:



*आजरा (हसन तकीलदार )*:-आजरा राईसमिलजवळील नमाजगा माळावरील परिसरात अस्ताव्यस्त पडलेल्या लाकडांच्यामुळे
आजऱ्यात ११ वर्षीय गरीब मुलाचा नाहक बळी पडला. यासाठी याचा योग्य तपास होऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने वन विभागाकडे केली आहे.

दिनांक : १५/०१/२०२६ रोजीआजरा राईस मिल परिसरात बेकायदेशीर व बेवारस टाकण्यात आलेल्या लाकडांच्या ओंडक्याखाली दबून ११ वर्षीय आदर्श किरण पोवार मुळगाव येरमाळा ता. कळंब, जि. धाराशिव याचा दुर्दैवी मृत्यू झाला. १४ जानेवारी रोजी पतंग खेळत असताना ओंडका डोक्यावर कोसळून ही घटना घडली.
ही लाकडे बिगर परवाना असल्याने सॉ मिलपासून दूर टाकण्यात आल्याचा संशय असून, रात्री बेकायदेशीररित्या कापणी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी कोणतीही सुरक्षा न करता लाकडे ठेवण्यात आल्याने गंभीर निष्काळजीपणा झाला असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने वनपरिक्षेत्र अधिकारी, पोलीस निरीक्षक व नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन देत दोषींवर भारतीय वन अधिनियमानुसार गुन्हे दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष तथा नूतन नगरसेवक बामणे भाऊजी म्हणाले की,पोट भरण्यासाठी आलेल्या एका गरीब कुटुंबातील निष्पाप लेकरु खेळता खेळता दगावला आहे. त्यामुळे या माळावरील जी लाकडे आहेत त्यांनी आपली आहेत हे सिद्ध करावीत आणि जी बेवारस आहेत ती वनखात्याने ताब्यात घेऊन लिलावत काढावीत असे म्हटले आहे.
 निवेदनावर अध्यक्ष परशुराम बामणे,उपाध्यक्ष जोतीबा आजगेकर,मंजूर मुजावर तसेच मदन तानवडे, संजय जोशी, दिनकर जाधव व संतोष बांदिवडेकर यांच्या सह्या आहेत. निवेदन सादर करताना बंडोपंत चव्हाण, मिनीन डिसोझा, सचिन बिरजे, डॉ. अशोक माने, जावेदभाई पठाण व सईदभाई मुल्ला आदिजण उपस्थित होते.


त्या गरीब मुलाच्या बळीस कारणीभूत असलेल्यांच्यावर करावाईची मागणी
Total Views: 628