ताज्या बातम्या
संकेश्वर–बांदा महामार्गामुळे आजऱ्यात वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गाची मागणी तीव्र
By nisha patil - 12/13/2025 1:01:11 PM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार) : संकेश्वर–बांदा महामार्ग सुरू झाल्यापासून आजरा शहरात वाहतुकीची गंभीर कोंडी निर्माण झाली आहे. जुने पोलीस स्टेशन ते आजरा पेट्रोल पंपदरम्यान महामार्ग अरुंद असून दोन्ही बाजूंना दुकाने, गॅरेज व हॉटेल्स असल्याने रस्त्याकडेला वाहने उभी राहतात.
त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. टोलनाका स्थलांतराबाबत अद्याप निर्णय न झाल्याने नाराजी आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता आजरा शहराच्या बाहेरून महामार्गासाठी पर्यायी मार्ग (बायपास) काढण्याची गरज आता प्रकर्षाने व्यक्त होत आहे.
संकेश्वर–बांदा महामार्गामुळे आजऱ्यात वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गाची मागणी तीव्र
|