बातम्या
शिंगणापूर पाणी योजनेसाठी निधीची मागणी – आमदार अमल महाडिक
By nisha patil - 4/29/2025 5:13:37 PM
Share This News:
शिंगणापूर पाणी योजनेसाठी निधीची मागणी – आमदार अमल महाडिक
कोल्हापूर शहरातील वारंवार पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार अमल महाडिक यांनी शिंगणापूर पाणी योजना अद्ययावत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत ४.५० कोटी रुपयांच्या निधीची मागणी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे.
या योजनेत दोन ७१० अश्वशक्तीचे पंप बदलण्याची गरज आहे. थेट पाईपलाईन योजनेतील तांत्रिक त्रुटीमुळे शहरातील पाणीपुरवठा खंडित होत असल्याने शिंगणापूर योजना सक्षम ठेवणे आवश्यक आहे, असे महाडिक यांनी सांगितले. यासंदर्भात लवकरच बैठक घेणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री आबिटकर यांनी दिले.
शिंगणापूर पाणी योजनेसाठी निधीची मागणी – आमदार अमल महाडिक
|