बातम्या

*कचरा व्यवस्थापन व विकासकामांसाठी निधीची मागणी :

Demand for funds for waste management and development works


By Administrator - 3/30/2026 5:01:12 PM
Share This News:



*कचरा व्यवस्थापन व विकासकामांसाठी निधीची मागणी :
 

आजरा(हसन तकीलदार): आजरा नगरपंचायतीतील वाढत्या कचरा व्यवस्थापनाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक व नगरसेविकेसोबत शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेऊन तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
 

नगरसेवक परशुराम बामणे(भाऊजी), नगरसेविका डॉ. सौ. स्मिता सुधीर कुंभार    तसेच डॉ. श्रदानंद ठाकुर साहेब, सुधीर कुंभार,अतुल पाटील (अध्यक्ष, रवळनाथ कॉलनी),मयूर परळकर व अमोल जाधव इतर पदाधिकाऱ्यांनी  प्रत्यक्ष पालकमंत्री नाम.प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन शहरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधले.
 

आजरा शहराची स्थायी लोकसंख्या सुमारे २४ हजार असून दररोज १४ ते १५ हजारांची तरंगती लोकसंख्या शहरात येत असते. शहराची भौगोलिक रचना गुंतागुंतीची असल्याने कचरा संकलन व वाहतूक व्यवस्थेत मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.

नगरपंचायतीकडे आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री अपुरी असून, कचरा उठाव करणाऱ्या जुन्या ठेकेदाराची मुदत संपल्यामुळे तसेच नवीन निविदा प्रक्रियेतही अडथळे येत असल्यामुळे  परिणामी शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
 

या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत आजरा नगरपंचायतीस कचरा संकलन व वाहतूक व्यवस्थेसाठी तातडीने निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
 

तसेच, आजरा नगरपंचायत वार्ड क्र. १५ मधील उर्वरित गटार बांधकाम व रस्त्याच्या कामांसाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची  वैयक्तिक मागणी नगरसेवक  बामणे भाऊजी यांचे कडुन करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
 

पालकमंत्र्यांनी या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन संबंधित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्याच बरोबर रस्ते आणि पाणी पुरवठा योजनेबाबतही चर्चा करणेत आली आणि शहरातील रस्ते अजून पूर्ण का झाले नाहीत असे मंत्रीमहोदयांनी विचारणा केली त्या वेळी काही रस्ते अपुर्ण आहेत आणि जे रस्ते झाले आहेत त्या ठिकाणी पाण्याची पाईप लाईन रस्त्याच्या मधून गेलेमुळे त्या ठिकाणी  पाण्याची गळती काढण्यासाठी  सिमेंटचा रस्ता फोडून पाईपची गळती काढावी लागत  असे अन्याय निवारण समितीने पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले  त्यावेळी पालकमंत्री म्हणाले की संबंधितांच्या बरोबर चर्चा  करून सर्व विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही दिल्याची माहिती  देण्यात आली आहे.


*कचरा व्यवस्थापन व विकासकामांसाठी निधीची मागणी :
Total Views: 16