बातम्या
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तातडीने अंमलबजावणीची मागणी
By nisha patil - 4/15/2025 4:01:37 PM
Share This News:
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तातडीने अंमलबजावणीची मागणी
कृषीपंप वीजबिल माफी आणि जीएसटी रद्द करण्याची मागणी
शेतकरी कामगार पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी तात्काळ करावी, अशी मागणी करत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिले. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चावर 50% नफा द्यावा, आधारभूत किंमत जाहीर करावी, तसेच वीज, खते, औषधे यांचे दर स्थिर ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली. एप्रिल 2024 पासून 7.5 HP पेक्षा जास्त क्षमतेच्या पंप धारकांना वीजबिल माफ करावे, शेतीवरील जीएसटी रद्द करावा आणि एफआरपी दर वाढवावा, अशीही मागणी झाली. कोल्हापूर जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तींमुळे उत्पादनात घट झाली असून, हेक्टरी 27 हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तातडीने अंमलबजावणीची मागणी
|