राजकीय
राजर्षी शाहू जन्मस्थळ वस्तुसंग्रहालयाच्या उद्घाटनाची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाची पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे लेखी विनंती
By nisha patil - 10/28/2025 1:10:57 PM
Share This News:
कोल्हापूर :- अखिल भारतीय मराठा महासंघाने कोल्हापूरचे पालकमंत्री आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळ वस्तुसंग्रहालयाच्या लवकरात लवकर उद्घाटनाची मागणी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांच्या मते, शाहूप्रेमी जनतेची अपेक्षा होती की ऐतिहासिक वाघनख्यांच्या प्रदर्शनासह वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन एकाच वेळी व्हावे, मात्र सध्या केवळ वाघनखे प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
राजर्षी शाहू जन्मस्थळ विकास आणि वस्तुसंग्रहालयाचा प्रकल्प अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर पूर्ण झाला असून, त्याचे उद्घाटन आता विलंब न करता करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच या निवेदनाची प्रत सांस्कृतिक, माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनाही पाठविण्यात आली आहे.
राजर्षी शाहू जन्मस्थळ वस्तुसंग्रहालयाच्या उद्घाटनाची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाची पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे लेखी विनंती
|