बातम्या

शिरोळ तालुक्यात महापुर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या निधीतून ५०० कोटींची तरतूद करण्याची मागणी

Demand for provision of Rs 500 crore


By nisha patil - 6/20/2025 9:04:08 PM
Share This News:



शिरोळ तालुक्यात महापुर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या निधीतून ५०० कोटींची तरतूद करण्याची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यात वारंवार उद्भवणाऱ्या महापुराच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जागतिक बँकेच्या निधीतून ५०० कोटींची तरतूद करावी, अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने करण्यात आली.

यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पाटबंधारे विभागासोबत बैठक पार पडली. यामध्ये नद्यांचे खोलीकरण, सरळीकरण, गाळ काढणे, पुलांचे भराव हटवणे यासारख्या कामांवर भर देण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.

आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी शिरोळ तालुका हा सर्वाधिक बाधित असल्याने जागतिक बँकेच्या ३२०० कोटी निधीतून या भागासाठी ५०० कोटींचा हिस्सा द्यावा अशी मागणी केली. यावर पाटबंधारे विभागाच्या स्मिता माने मॅडम यांनी सर्वेक्षण सुरू असून लवकरच अंतिम अहवालानंतर विकास आराखडा तयार केला जाईल, अशी माहिती दिली.

या बैठकीस आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अमोल संकपाळ, पाटबंधारे अधिकारी मेहेत्रे, तसेच दीपक पाटील, गोपाळ चव्हाण, नागेश काळे, रशीद मुल्ला, भगवान कोइगडे, आनंद भातमारे, संतोष दिक्षित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाने महापुराच्या काळात मदतकार्य आणि पाणी व्यवस्थापनासाठी सतर्क राहावे, तसेच सध्या वाढलेल्या पाण्याचा विसर्ग सुरळीत होण्यासाठी कर्नाटक सरकारने हिप्परगी बॅरेजचे दरवाजे १५ सप्टेंबरपर्यंत खुले ठेवावेत, अशी सूचना यावेळी करण्यात आली.


शिरोळ तालुक्यात महापुर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या निधीतून ५०० कोटींची तरतूद करण्याची मागणी
Total Views: 300