बातम्या

दुधाळी परिसरातील रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी...

Demand for road repair in Dudhali area


By nisha patil - 2/12/2025 3:41:57 PM
Share This News:



दुधाळी परिसरातील रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी...

 भाजप उत्तरेश्वर मंडळाचे ठिय्या आंदोलन..

 दुधाळी परिसरातील उत्तरेश्वर पेठ–रंकाळा टॉवर जोडणाऱ्या आणि यंग टायगर ते महाराणा प्रताप हायस्कूलपर्यंतच्या मुख्य रस्त्याची झालेली दुरावस्था दखल न घेतल्याने आज भाजपा उत्तरेश्वर मंडळाने ठिय्या आंदोलन केले. रस्ता व पुलाच्या तातडीच्या नूतनीकरणाची मागणी अनेक वेळा केली असूनही महापालिकेने कारवाई न केल्याचा आरोप करण्यात आला.

नागरिक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी करत उग्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. आंदोलनस्थळी महापालिकेच्या जेई पठवेगार मॅडम उपस्थित राहून प्रत्यक्ष पाहणी केली व रस्ता लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

या आंदोलनात विराज चिखलीकर, सुनिल पाटील, भरत काळे, सुशांत पाटील, राजू माने, हेमंत कांदेकर, दीपक काटकर, अमेय भालकर, अनिकेत अतिग्रे, नरेश जाधव, राहुल घाडगे, विश्वजीत पवार, वल्लभ देसाई, रोहित कारंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दुधाळी परिसरातील रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी...
Total Views: 24