बातम्या
सिद्धार्थनगर दंगल प्रकरणी कडक कारवाईची मागणी
By nisha patil - 8/30/2025 3:00:22 PM
Share This News:
सिद्धार्थनगर दंगल प्रकरणी कडक कारवाईची मागणी
कोल्हापूर शहरातील सिद्धार्थनगर येथे एका मंडळाच्या वाढदिवसाच्या वादातून दोन समाजांमध्ये उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर *‘कोल्हापूर नेक्स्ट’*च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात दंगलखोरांसह त्यांच्या सूत्रधारांवरही आयुष्यभर लक्षात राहील अशी कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
या प्रसंगी निमंत्रक चंद्रकांत चव्हाण, अजित ठाणेकर, चंद्रकांत घाटगे, विजयसिंह खाडे पाटील, प्रदीप उलपे आणि ऋतुराज नढाळे उपस्थित होते.
सिद्धार्थनगर दंगल प्रकरणी कडक कारवाईची मागणी
|