ताज्या बातम्या

शहीद-ए-आझम भगतसिंह यांच्या जयंतीस शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी

Demand to declare a government holiday


By nisha patil - 9/25/2025 2:44:21 PM
Share This News:



कोल्हापूर :- उज्वल कोल्हापूर संघटनेतर्फे मा. मुख्यमंत्री व मा. उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन २८ सप्टेंबर – शहीद भगतसिंह जयंती शासकीय सुट्टी म्हणून घोषित करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

संघटनेचे प्रमुख गणेश संजय लाड यांनी सांगितले की, “महात्मा गांधी जयंती व टिळक पुण्यतिथीला शासकीय सुट्टी जाहीर केली जाते, मात्र देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या क्रांतीवीर भगतसिंह यांना तोच सन्मान मिळाला पाहिजे.”

निवेदनात पुढे म्हटले आहे की –

सुट्टी जाहीर झाल्यास शाळा, महाविद्यालये व सरकारी कार्यालयांमध्ये भगतसिंह विचार प्रसाराचे कार्यक्रम घेता येतील.

यामुळे देशभक्तीची भावना नव्या पिढीपर्यंत पोहोचेल.


लाड यांनी इशारा दिला की, शासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्यास संघटनेला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल.

“ज्या मातीने भगतसिंह दिला, त्या मातीत आम्हीही जन्मलो आहोत, आम्ही गप्प बसणार नाही!” असे भावनिक उद्गारही यावेळी काढण्यात आले.

या वेळी उज्वल कोल्हापूर संघटनेचे गणेश लाड, अजित पाटील, यशवंत शेळके, संजय चव्हाण, प्रसाद पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

 


शहीद-ए-आझम भगतसिंह यांच्या जयंतीस शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी
Total Views: 226