बातम्या

श्री तिरुपती बालाजी येथे महाराष्ट्र सदन स्थापन करण्याची मागणी – आमदार राजेश क्षीरसागर

Demand to establish Maharashtra


By nisha patil - 8/14/2025 2:36:17 PM
Share This News:



श्री तिरुपती बालाजी येथे महाराष्ट्र सदन स्थापन करण्याची मागणी – आमदार राजेश क्षीरसागर

भाविकांच्या सोयीसाठी आमदार क्षीरसागर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

श्री तिरुपती बालाजी मंदिर येथे जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांना दर्शन व निवासाच्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सदन स्थापन करावे, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार क्षीरसागर यांनी नमूद केले की, इतर राज्यांचे भक्तनिवास व निवासभवन येथे कार्यरत आहेत, मात्र महाराष्ट्रातील भाविकांसाठी कोणतीही सुसज्ज सुविधा उपलब्ध नाही. महाराष्ट्र सदन स्थापन झाल्यास दर्शन पास, निवासव्यवस्था व पर्यटन माहिती एका ठिकाणी मिळेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची दखल घेत, सामान्य प्रशासन विभागाच्या अवर मुख्य सचिवांना तपासून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच आंध्रप्रदेश शासनाकडे अधिकृत पाठपुरावा करण्याचे निर्देशही दिले आहेत.

श्री तिरुपती बालाजी मंदिरास दरवर्षी महाराष्ट्रातून लाखो भाविक भेट देतात. यातील बरेच भाविक कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीचेही दर्शन घेतात. भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी महाराष्ट्र सदनाची उभारणी आवश्यक असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.


श्री तिरुपती बालाजी येथे महाराष्ट्र सदन स्थापन करण्याची मागणी – आमदार राजेश क्षीरसागर
Total Views: 102