बातम्या
कोल्हापूर जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी औद्योगिक सहकारी संस्थांना प्राधान्य देण्याची मागणी
By nisha patil - 1/5/2025 5:31:37 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी औद्योगिक सहकारी संस्थांना प्राधान्य देण्याची मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी – कोल्हापूर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक सहकारी संस्थांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबिटकर यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती विश्वास कांबळे यांनी दिली.
सोमवार, दि. २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित सहकार दिन कार्यक्रमात ही मागणी करण्यात आली. या वेळी पालकमंत्री आंबिटकर यांनी संबंधित कार्यालयांना यासंदर्भात योग्य ती सूचना देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा निबंधक, तालुकास्तरावरील सहाय्यक निबंधक, तसेच जिल्ह्यातील विविध पतसंस्था, सेवा सोसायट्या, औद्योगिक सहकारी संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिरोळचे सहाय्यक निबंधक अनिल नादरे यांना या संदर्भात विशेष सूचना देण्यात आल्या. पतसंस्था संघटनेचे नेते रमेश मिठारी व अभिषेक विधाते यांनी पालकमंत्र्यांना निवेदन सादर करून सहकार क्षेत्रातील अडचणी व रोजगाराच्या संधींबाबत चर्चा केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी औद्योगिक सहकारी संस्थांना प्राधान्य देण्याची मागणी
|